मा. आ. अॅड. शहाजीबापू पाटील यांच्याकडून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सांत्वन

राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे दीर्घ आजाराने यांचे दुःखद निधन झाले. भगवानराव रामचंद्र गोरे यांच्यांवर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी ना. गोरे यांच्या घरी जाऊन त्यांचे संत्वन केले. माण तालुक्यातील बोराटवाडी येथील ना. जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन सांगोला तालुका व अॅड. शहाजीबापू पाटील यांचे कुटुंबीय गोरे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.