इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठा तसेच कृष्णा व पंचगंगा योजना बळकटीकरण, कॉ. के. एल. मलाबादे चौक विकसीत करणे या संदर्भात आम. राहुल आवाडे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच कृष्णा योजनेचे बळकटीकरणाचा तिसरा टप्प्याचे काम सुरू आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व मक्तेदारांना दिल्या.
पाईपलाईनची जलदाब चाचणी घेण्याची सूचना केली. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ९४ बोअरवेलची स्वखर्चाने दुरूस्त करून देणार असल्याचे आम. आवाडे यांनी सांगितले. कॉ. मलाबादे चौकात धर्मवीर छ. संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासदंर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यक असलेल्या प्रक्रिया तातडीने सुरू करावी, आम. आवाडे यांनी आयुक्त पाटील यांच्याकडे मागणी केली.