आ. राहुल आवाडे यांच्याकडून इचलकरंजी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

इचलकरंजी शहरातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरणाचे काम लवकरच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आ. राहुल आवाडे यांनी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून आ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून ६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणासाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या आरोग्य केंद्रांमुळे इचलकरंजीतील नागरिकांना मोफत व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

लालबहाद्दुर शास्त्री शाळा क्र. ३४ कलानगर, भारतमाता विद्या मंदिर शाळा क्र. ३३ शाहु पुतळा, हुतात्मा भगतसिंग शाळा क्र. २२ विक्रमनगर, झाकीर हुसेन उर्दु शाळा खंजिरे मळा, वेणुताई विद्या मंदिर हॉल आंबेडकरनगर आणि म्युन्सिपल हॉल जवाहरनगर पोस्ट ऑफिसजवळ यांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ज्या त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा, औषधोपचार केले जातात. ही प्राथमिक केंद्रे अत्यंत जुनी असल्याने इमारतींची अवस्था जीर्ण झाली असलेने या केंद्रांच्या नुतनीकरणाची गरज होती. यावेळी संबंधित अधिकारी, प्रमुख उपस्थित होते.