वाळवा तालुक्यातील पेठ येथील श्री खंडेश्वर मंदिर ते माणकेश्वर मंदिरालगत असणाऱ्या मुख्य ओढयाची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. हे काम ग्रामदैवत श्री माणकेश्वर, श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून माजी वसुंधरा अभियानांतर्गत सुरू केले आहे. संरक्षण भिंत बांधल्यामुळे ओढापत्रात जे.सी. बी. मशीन उतरण्यास अडचण होत असल्यामुळे मोठा पोकलेन आणूण ओढापत्रातील स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
गावातील प्रमुख मार्गावरील गटारीतील कचरा काढून तेथे डासरोधक पावडर टाकली आहे. पाणी, वीज व्यवस्था केली आहे. यामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष महेश माळी व सर्व सदस्य, सरपंच डॉ. सुभाष भांबुरे, उपसरपंच रविकिरण बेडके स्वतः उभा राहून स्वच्छता करून घेत आहेत. ओढा पत्राची स्वच्छता केल्याने परिसरातील लोकांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.