खानापूर नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

खानापूर नगरपंचायत खानापूर नगरपंचायतच्या सभापती निवडी बिनविरोध त्यापुढीलप्रमाणे, सभापतीपदी सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, सुनील प्रभाकर मंडले, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सौ चंदना पांडुरंग भगत, आरोग्य व स्वच्छता समिती, जयश्री स्वप्नील मंडले, महिला व बालकल्याण समिती सुवर्णा प्रल्हाद कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, सहाय्यक अधिकारी मुख्याधिकारी सोनाली यादव मॅडम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी नूतन सभापती यांचा सत्कार माजी जि प सदस्य श्री सुहास (नाना) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ सुमन पाटील, नगरसेवक रोहित त्रिंबके, गटनेत्या सौ मेघना हिंगमिरे, नगरसेविका सौ माणकाबाई ठोंबरे, नगरसेविका सौ. लता माळी शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग (दादा) भगत, नवभारत विकास सोसायटी चेअरमन श्री. बलराज माने, जेष्ठ नेते बबन माने, युवानेते हर्षवर्धन माने, सतिष भगत श्री. संदीप माने सर आदी मान्यवर उपस्थित होते.