बहे येथील दारू विक्रेत्यावर कारवाई

वाळवा तालुक्यातील बहे येथील बस थांब्याच्या पाठीमागे कृष्णा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री
करणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
रघुनाथ सीताराम कुंभार (रा. बहे) असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द हवालदार शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी कुंभार याच्याकडून १ हजार ४०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या २० बाटल्या हस्तगत केल्या.