रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्यावरून ऊसवाहतूक अंगद गाडीची चोरी केल्याप्रकरणी शेखर हणमंत गुजले, वैभव रमेश पाटोळे, वैष्णव तानाजी मदने, अरुण दिलीप घळगे या चौघांच्या टोळीला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजारांचा ट्रॅक्टर, ८० हजारांची पांढऱ्या रंगाची ऊसवाहतूक अंगदगाडी असा एकूण ६ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास रेठरे बुद्रुक येथून सतिश कार्वेकर यांचा अंगद चोरी झाला होता. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय हारुगडे, डीबी पथकासह इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना चोरीस गेलेला अंगत रेठरेधरण- शिराळा रोडने जात असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली.
पोलिस पथकाने रेठरेधरण गावचे हद्दीत ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ०९ सी ४८०१) थांबवला. चालकाने वैभव रमेश पाटोळे असे नाव सांगीतले. त्याच्याकडे तो घेऊन जात असलेल्या अंगतबाबत चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने ऊसवाहतुकीसाठी वापरत असलेला अंगद गाडी रेठरे बुद्रुक कारखान्यावरुन शेखर हणमंत गुजले, वैष्णव तानाजी मदने, अरुण दिलीप घळगे यांच्या साथीने चोरी केल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास सपोफी संदेश यादव करीत आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितु खोखर, पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय हारुगडे. सपोफी संदेश यादव, शशिकांत शिंदे, पोकॉ अमोल सावंत, पोकॉ दीपक घस्ते, विशाल पाँगे, कॅटन गुंडवाडे च विवेक सांळुखे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
