विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडण्यात आणि आपल्याकडे वळवण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे. इस्लामपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.वाळवा तालुक्यातील ढवळी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील काका तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील, युवक राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष अभिजीत नलवडे, ढवळी स्पोर्ट्स ढवळीचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, हेमंत पाटील, शशिकांत पाटील, दीपक पाटील, विराज पाटील, लालासो पाटील, अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष उत्तम वायदंडे, नितीन कांबळे, संभाजी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यामुळे वारणा पट्ट्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
Related Posts
इस्लामपूरात मालमत्ता नियमितीकरणाच्या नावाखाली आर्थिक लूट….
मालमत्ता नियमितीकरणाच्या नावाखाली परवानाधारक अभियंत्यांकडून नागरिकांची सुरू असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्याकडे…
नवेखेडला बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई…
नवेखेड (ता. वाळवा) येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास…
इस्लामपूरात सर्व्हर बंदमुळे मिळेनात दाखले वारंवार हेलपाटे!
सध्या सगळीकडे कुणबी दाखले आणि त्याचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे. इस्लामपूर येथील सेतू कार्यालयात सर्व्हर डाउनच्या नावाखाली दाखल्यांसाठी नागरिकांना चार-चार…