हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात उभी फूट

राज्यातील सत्ता बदलामुळे उमेदवारीचा घोळ झाल्यानंतर अनेक विद्यमान आणि माजी आमदारांनी बंडाचे निशान फडकवले आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भगदाड पडले आहे.महाविकास आघाडीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात उभी फूट पडली आहे.

या दोन मतदारसंघातील जागा काँग्रेसला गेल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन माजी आमदार ‘स्वाभिमानी’च्या गळाला लागले आहेत. आज या दोघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचा ‘स्वाभिमानी’त प्रवेश केला.हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. मात्र विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने ही जागा काँग्रेसला दिली. काँग्रेसकडून राजू बाबा आवळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार मिणचेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.