आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ राहिला नाही. स्पर्धेच्या 17 व्या हंगामाचा 22 मार्चपासून थरार सुरू होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो.
अलीकडेच संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली होती.मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर जाऊ शकतो.
सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पुनरागमन करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आगामी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाहेर जाऊ शकतो.
मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (27 मार्च) होणार आहे. या दोन सामन्यांपूर्वी एनसीएचे वैद्यकीय पथक सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र देईल की नाही, याबाबत शंका आहे.