हातकणंगले तालुक्यातील कबनूर ऊरूसातील मनोरंजन खेळाचे दर आवाक्यात राहणार

कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसो-ब्रॉनसो ऊरुसा निमित्त भरणाऱ्या विविध मनोरंजन खेळाचे रोहित महादेव संकपाळ यांचे २९ लाखांचे सर्वात जास्त दराचे टेंडर मंजूर करण्यात आले. ऊरुस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुलोचना कट्टी होत्या. सरपंच सौ. सुलोचना कट्टी यांनी स्वागत केले. एकूण १९ टेंडरधारकांनी टेंडर्स भरली होती. कबनूर ऊरुसाच्या इतिहासात यावर्षी सर्वात जास्त व उच्चांकी असा दर मिळाला. मनोरंजनाच्या खेळामध्ये आकाशी पाळणे, ब्रेक डान्स, सलाम्बो, नावडी, टॉवर, क्रॉस, ड्रॅगन सह इतर खेळांचा समावेश आहे.

खेळाचे दर हे सर्वसामान्यांना परवडतील असे रु. २०, ३० व ४० याप्रमाणे राहतील असे ठरले. त्यामुळे ऊरुसाला येणाऱ्यांना ती एक पर्वणीच ठरणार आहे. यावेळी उपसरपंच  सुधीर लिगाडे, ऊरुस कमिटीचे पदाधिकारी, ग्रा. पं. सदस्य मधुकर मणेरे, सुधीर पाटील, सैफ मुजावर, सुनील काडाप्पा, सौ. वैशाली कदम, सौ. अर्चना पाटील, सौ. रोहिणी स्वामी, सौ. स्वाती काडाप्पा यांच्यासह प्रमोद पाटील, मिलिंद कोले, बबन केटकाळे, विजय देसाई, शांतीनाथ कामत, हुसेन मुजावर, अजित खुडे, राहुल कांबळे, संजय कट्टी, किशोर पाटील, दत्ता पाटील, अल्ताफ मुजावर, कमाल मुजावर, सुनिल इंगवले, रवी धनगर, मनोज जाधव, नितीन गवळी, दिग्विजय इंगवले व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी आभार मानले.