हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी येथे मालवाहू टेम्पोची कारला धडक; तिघे जखमी 

हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी फाट्यानजीक महामार्गावर मालवाहू टेम्पोने पाठीमागुन कारला धडक दिल्याने कार उलटून तिघे जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. अपघातात संजय धोंडीराम पवार, वैशाली संजय पवार, वैजयंती देवळे अशी जखमींची नावे आहेत. पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे येथील पवार कुटुंबीय देवदर्शनासाठी कोल्हापूरकडे कार मधून येत होते. राष्ट्रीय महामार्गावर अंबपवाडी फाट्याजवळ मोहिते मिलसमोर त्यांच्या कारला सुरतहून कोईमतूरला कापड भरून निघालेल्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने दोन्ही वाहने उलटली. यात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले.