भारतीय जनता पक्षाच्या मजबूत बांधणीसाठी बुद्ध कमिट्यांवर भर देणे गरजेचे असून येत्या काळात त्या सक्षम करणार असल्याचे मत सांगली जिल्हा बँकेचे संचालक, भाजपा नेते राहुल महाडीक यांनी व्यक्त केले. इस्लामपूर येथे विधानसभा कार्यक्षेत्रातील बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी आ. भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, जिल्हा सरचिटणीस विलास काळेयाग यांची प्रमुख उपस्थिती होती. महाडीक म्हणाले, राज्यात भाजपला कळाले असून येत्या काळातही यशाची हीच परंपरा जोपासायची आहे. बूथ कमेठीवर भर देण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांच्या निवडी व पक्ष बांधणी केली जाईल.
विक्रम पाटील म्हणाले, भाजप पक्षात घटनेप्रमाणे काम चालते. प्रामाणिक काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकत्यांचा विचार केला जातो. पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकत्यांला पक्षातील प्रत्येक घटक मदत करतो. यामुळे पक्ष संघटन सक्षम होईल, भाजपा सदस्यता नोंदणी अभियानात पुढाकार घेतलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषद गटनिहाय चर्चा आयोजित करत आढावा घेण्यात आला.