क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यतिथी निमित्त दिआटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंची येथील सहशिक्षक श्री. जयसिंग देशमुख सर यांनी लिहिलेल्या माझ्या लेकी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिर हॉल येथे संपन्न झाला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंचीचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विदयालय, दिघंची असे नामकरण करणार असल्याचे तसेच या इमारतीमध्ये सावित्रीबाई फुलेंचा अर्ध पुतळा बसविणार असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री. अमरसिंह देशमुख यांनी जाहिर केले.
त्यासाठी दिघंची येथील प्रशालेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी सुमारे दोन कोटी खर्चुन नवीन इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत विद्यार्थीनींसाठी सर्व शैक्षणिक सोयींनी सुसज्ज असून लवकरच आटपाडी तालुक्यातील एक उत्तम विदयालय म्हणून ते पुढे येईल अशी अपेक्षा व्यक्त करीत या विदयालयास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विदयालय, दिघंची असे नांव देणार असल्याचे श्री. अमरसिंह देशमुख यांनी जाहीर केले. तसेच यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एक उत्तम स्मारक उभा राहणार आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच येत्या नवीन शैक्षणिक वर्षात १५ जून २०२५ रोजी या स्मारकाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी श्री. अमरसिंह देशमुख यांनी स्पष्ट केले.