दि आटपडी एज्युकेशन सोसायटी दिघंची गर्ल्स हायस्कूलचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नामकरण

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत दि आटपडी एज्युकेशन सोसायटीचे दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंचीचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय दिघंची असे नामकरण करणार तसेच या इमारतीमध्ये सावित्रीबाई फुलेंचा अर्ध पुतळा बसविणार असल्याच्या भावना अमरसिंह देशमुख यांनी दिघंचीत व्यक्त केल्या.

जयसिंग देशमुख लिखीत ‘माझ्या लेकी’ या पुस्तकांचे प्रकाशन योवळी करण्यात आले.यावेळी देशमुख म्हणाले, दिघंची येथील प्रशालेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी दोन कोटी खर्चुन नवीन इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत विद्यार्थीनीसाठी सर्व शैक्षणिक सोयीनी सुसज्ज असून लवकरच आटपाडी तालुक्यातील एक उत्तम विद्यालय म्हणून ते पुढे येईल या विद्यालयास क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय दिघंची असे नावं देणार आहे.

यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एक उत्तम स्मारक उभा राहणार आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षात १५ जून २०२५ रोजी या स्मारकाचे उदघाटन सोहळा होणार आहे.