आटपाडी सूतगिरणी विक्रीला स्थगिती द्या : आ. गोपीचंद पडळकर

आटपाडीची दोन वर्षापूर्वी झालेल्या सूतगिरणी विक्रीला स्थगिती द्यावी यावाचत जिल्हा बँकने चुकीची पध्दत अवलंबली असून याबाबत जिल्हा बँकेचे संचालक मंडळावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी आ. गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळात केली आहे. यावेळी मंत्र्यांनी याबाबत योग्य कारवाई करु, अशी ग्वाही दिलीआ.

गोपीचंद पडळकर म्हणाले, दोन वर्षापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकने आटपाडीची सहकारी सूतगिरणी लिलावात काढून त्यांची रक्कम चाळीस कोटी ठेवण्यात आली होती. परंतु साठे अकरा कोटीला या सूतगिरणीची विक्री केली आहे. त्यांचा दस्त होताना साठे अकरा कोटीची स्टंप्म डुड्ट्टी भरावी लागत असताना शंभर कोटीची स्टंप्म डुटी भरुन घेतली आहे.

८८ कोटीचा भष्ट्राचार जिल्हा बँकेने केला आहे. राज्य सरकाने २४ कोटी रुपये दिले होते. त्या पैसे बँकेने भरून घेतले नाहीत. त्यामुळे आटपाडी सूतगिरणीच्या विक्रीला स्थगिती द्यावी, अशी मागणी विधी मंडळात आ. गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.