आजकाल गुन्हेगारी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. आटपाडी येथे गेल्या चार दिवसामध्ये दोन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी येथील रेश्मा सुरेश पाटील यांच्या घरी बुधवारी रात्री ९.३० वाजता बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करत लाकडी कपाटात ठेवलेला सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, वीस ग्रॅम वजनाची चांदीची चेन, ४० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण व अन्य असा एकूण ४५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
मंगळवार ते गुरुवारदरम्यान महादेव पांडुरंग बनसोडे यांची बहीण शुभद्रा अशोक शिंदे यांच्या बंद घराचे दरवाजे तोडून स्टीलची भांडी, चांदीची भांडी, सीसीटीव्ही डिव्हीआर व अन्य साहित्य, अशी ४६ हजार ६७० रुपयांची चोरी केली. याबाबत महादेव पांडुरंग बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे.