आटपाडीत बोगस खरेदीपत्राद्वारे फसवणूक! गुन्हा दाखल


अलीकडच्या या काळात फसवणुकीच्या घटना खूपच वाढत आहेत. माणसे ही ही आता एकमेकांवर विश्वास देखील ठेवत नाहीत. कारण त्यांना भीती असते ती म्हणजे आपलीं फसवणूक त्री होणार नाही ना. अशीच एक फसवणुकीची घटना आटपाडीत घडली आहे. बनावट दस्त खरेदीपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी संजय लक्ष्मण कोकरे, राजू लक्ष्मण कोकरे, रेखा राजू कोकरे (सर्व रा. करगणी, ता. आटपाडी) आणि यशवंत रतन रोखडे (सध्या रा. इस्लामपूर) या चौघांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संतोष आण्णा सरगर (रा. करगणी) यांनी जमीन खरेदी फसवणूकप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला होता. गुन्ह्याच्या संदर्भाने न्यायालयामध्ये चौकशी केली.

त्यानंतर फसवणूक केल्याबद्दल न्यायालयाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार संतोष सरगर यांनी गुन्हा दाखल केला. जमीन खरेदी करण्यासाठी ६ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान निबंधक कार्यालयात संजय लक्ष्मण कोकरेने मारुती बिरा रुपनर सरगर ही व्यक्ती आपणच आहे असे दाखवले. बोगस मतदार कार्ड तयार करून जमीन मिळकतीचे बोगस बनावट खरेदीपत्र तयार केले. राजू कोकरे, रेखा कोकरे आणि यशवंत रोखडे यांनी सहकार्य केले होते. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे करत आहेत.