आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर त्यांचा स्वतःचा मतदारसंघ सोडून जतमधून तयारी सुरु केली आहे. इच्छुकांची गर्दी असल्याने जतमध्ये तिकीट मिळविताना भाजपअंतर्गत मोठा संघर्ष होण्याची दाट चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना खानापूर विधानसभा मतदार संघात मोठा फटका बसला. पडळकरांसह अनेक दिग्गज नेत्यांची साथ मिळूनही या भाजपचे स्टार प्रचारक असलेले व गतवेळी संजय पाटील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतून लढलेले गोपीचंद पडळकर यांच्या स्वतःच्या तालुक्यामधून भाजपाला मतदान खेचता आले नाही. पडळकर राहत असलेल्या झरे येथूनही संजय पाटील यांना कमी मते मिळाली आहेत.
जतमध्ये करावी लागेल कसरत कोणत्या गावात कोणाला मताधिक्य विशाल पाटील यांना विभूतवाडी, खरसुंडी, नेलकरंजी, जांभुळणी, झरे, गोमेवाडी, करगणी, बनपुरी, निंबवडे, लिंगीवरे, राजेवाडी, दिघंची, शेटफळे, आटपाडी या गावांत मताधिक्य मिळाले. तर संजय पाटील यांना पिंपरी बु घरनिकी, वलवण, चिंचाळे, पारेकरवाडी, वालेवाडी, मिटकी, बाळेवाडी, हिवतड, तडवळे, पात्रेवाडी येथे मताधिक्य मिळाले.पडळकरांनी स्वतःच्या तालुक्याकडे दुर्लक्ष करून जत विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळविला आहे. जतमध्ये त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याठिकाणीही त्यांना स्थानिक भाजपाच्या नेतेमंडळीशी तिकीट मिळवताना संघर्ष करावा लागू शकतो.मतदारसंघात संजय पाटील यांची पिछेहाट झाली.
पडळकर यांच्या हक्काच्या आटपाडी तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांना तालुक्यातून १६ हजारावर मताधिक्य विधानसभा मिळाले. खानापूर मतदारसंघात महायुतीच्याच भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची मोठी ताकद व यंत्रणा आहे. खानापूर तालुक्यात दिवंगत माजी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आटपाडी तालुक्यातून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील अशी दिग्गज नेतेमंडळी पाठीशी होती. शिंदे गटाचे तानाजी पाटील यांनी विशाल पाटील यांनाच साथ दिली.