हातकणंगले तालुक्यात १०२६ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवारी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली. बैठकीपूर्वी आमदार अशोकराव माने यांनी संजय गांधी समितीच्या कार्याचा आढावा घेतला व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती शासनस्तरावर सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी समितीच्यावतीने आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण १०४१ प्रस्तावा पैकी १०२६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच १५ प्रस्तावात त्रुटी असल्याने सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले. यावेळी तहसिलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेल्हेकर, नायब तहसिलदार संदीप चव्हाण, समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, महेंद्र शिंदे, दौलत पाटील, सुदाम इंगवले, संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.