आदित्य अविनाश निंबाळकर याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास अनिकेत गोंदकर याने आदित्य याला फोन करुन विष्णु देडे याच्यासह चौघांनी त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यानंतर आदित्य याने तेजस देडे याला फोन करुन अनिकेत याच्या घरी का गेलास याचा जाब विचारला. त्यावर तेजस याने आदित्य याला घराबाहेर बोलविले. त्यावेळी विष्णु देडे, कार्तिक देडे, संदेश देडे, गोरख तोरडमल यांनी आदित्य याच्या घराबाहेर जावून शिवीगाळ करत धक्काबुकी केली. त्यामुळे आदित्य याने तेथून पळ काढला. मात्र पुन्हा रात्रीच्या सुमारास आदित्य हा सुतार मळा येथील दुकानात गेला असताना त्याठिकाणी पोपट देडे, धना देडे, विष्णु देडे, संदेश देडे, तेजस देडे, बप्पा देडे यांनी त्याला दुकानाबाहेर बोलावत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा काही वेळाने आदित्य हा लोकशाहिर आण्णाभाऊ साठे कमानीजवळ मित्रांसमवेत थांबला असताना उपरोक्तांसह गोरख तोरडमल, दत्ता देडे, बिभीषण कांबळे, चंद्रकांत कांबळे, ईसा देडे, मारुती देडे यांनी आदित्य याच्यावर काठीने हल्ला केला. आदित्य याचे मित्र अर्जुन भोसले व प्रेम कांबळे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी आदित्य निंबाळकर याच्या फिर्यादीवरुन १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दत्ता तुकाराम देडे याच्या फिर्यादीनुसार दत्ता देडे हे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ थांबले असताना बच्चन कांबळे याने तु मुलांच्या भांडणात कशाला पडतोस असे म्हणत अन्य साथीदारांसह हातात कोयता घेऊन दोन दिवसात तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली.
त्यावेळी देडे याचा पुतण्या अजय मारुती देडे व भाचा सुभाष धोंडीराम कसबे, बप्पा मारुती देडे, मुलगा विष्णु दत्ता देडे यांनी बच्चन कांबळेला तू असे का बोलत आहेस असे विचारले. तर सुमित बच्चन कांबळे याने सुभाष याला तु मध्ये बोलणारा कोण असे म्हणत कोयत्याने वार केला. पण सुभाषने तो चुकविला त्यामुळे सुमित याने काठीने सुभाषच्या पोटावर मारले. त्यानंतर गणेश बच्चन कांबळे, प्रेम कांबळे, आदित्य निंबाळकर, यश निंबाळकर, ऋतिक गवळी, अतिष भोसले, समाधान नेटके, शंकर कांबळे, अर्जुन भोसले, रोहन कांबळे, ओंकार ढमणगे, गणेश रामा कांबळे, स्वप्निल तारळेकर व साहिल यांनी रागाने काठ्या आणि दगडांनी दत्ता देडे याच्या दारातील स्विफ्ट कार च्या काचा फोडल्या.
यामध्ये गाडीचे १० हजाराचे नुकसान झाले. तसेच दारातील दोन बॅरेलही कोयत्याने मारत फोडले. तर बच्चन कांबळे व अर्जुन भोसले यांनी आमच्या नादाला लागला तर कोणाला सोडणार नाही असे धमकावत शिवीगाळ केली. या प्रकरणी देडे याच्या फिर्यादीवरुन पोलिस रेकॉर्डवरील ६ जणांसह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील १३ जणांना रात्रीच अटक केली होती. या सर्वांची न्यायालयाने वैयक्तिक जामीनावर सुटका केली आहे. तर उर्वरीत संशयितांचा शोध जारी आहे.