हातकणंगलेत चौगुले यांच्या निवडीने शिवसैनिकांचा जल्लोष!

संजय चौगुले यांची ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर हातकणंगलेतील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. तसेच माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा सत्कार माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला. हातकणंगले येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी संजय चौगुले यांची नूतन जिल्हाप्रमुख निवडीनंतर जल्लोष साजरा केला.