कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती बांधवांच्यावतीने इचलकरंजी शहरात शांतीदूत सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे यंदा २१ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत शहापूर रोड आवळे मैदानात ख्रिसमस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सदर ठिकाणी आध्यात्मिक, सामाजिक व व्यसनमुक्तीचे व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्राहाम किसनराव आवळे यांनी दिली.
यंदा प्रभू येशूच्या जीवनावरील महत्त्वपूर्ण क्षणांवर आधारित कार्यक्रम एल.ई.डी. स्क्रीनवर प्रक्षेपित केले जाणार आहेत. गुरुवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रारंभाची प्रार्थना ६.३० वा. स्तुती आराधना, आराधना, ७.०० वा. लहान मुलांचे ७.०० वाजता उद्घाटन सोहळा अक्शन साँग व येशू विस्तांच्या पार पडणार आहे. त्यानंतर ७.३० व ८.३०मध्यप्रदेश मधील साधू नित्यनंदमहाराज यांचे किर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
सदर महाराज हे जागतीक किर्तनकार असून गुरुवार व शुक्रवार या दिवशी प्रवचन करणार आहेत. व त्यांचे बायबल स्टडी दि. २२ इ. रोजी सकाळी १० आरगे भवन येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. त्यानंतर सांय ६ वाजता प्रारंभाची प्रार्थना, ६.३० वा. स्तुती आराधना, ७.००, अँक्शन साँग व ८.०० वा. साधू नित्यनंद महाराज यांचे किर्तन होणार आहे.
शनिवार दि. २३ रोजी ६.०० या प्रारंभाची प्रार्थना ६.३० वा. स्तुतीआराधना, ७.०० वा. लहान मुलांचे अनशन साँग व नाटीकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ७.३० ते ८.३० वा पा. रॉयस्टन डायस, गोवा महाराज यांचे किर्तन व प्रवचनांचे प्रवचन होणार आहे. रविवार आयोजीत करण्यात आलेले आहे.