वस्त्रनगरीत नवरात्रोउत्सव उत्साहात प्रारंभ

इचलकरंजी शहरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर नवरात्र उत्सवालाही धुमधडाकात सुरुवात झाली. बहुतांश मंडळांनी आकर्षित विद्युत रोषणाई करण्याबरोबरच डॉल्बी लावली होती .मिरवणूक वेळी डॉल्बीच्या आवाज वाढवण्याची जणू स्पर्धा सुरू होती .कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता .

घटस्थापनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती . झेंडूची फुले ,श्रीफळ यासह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उलट उडाली होती. सुमारे 300 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांबरोबरच शहरात विविध मंदिर आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.