वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात आठवडाभरात दहा ते बारा ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. दिवसा व रात्री बंद घरे, दुकाने लक्ष्य ठेवून फोडली जात आहेत. त्यामुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडी बाजारात मोबाइल व महिलांचे दागिने चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातील तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकारामुळे पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आठवडी बाजारातही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरातील हनुमान मंदिरातील दानपेटी भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न चोऱ्या रोखण्यासाठी निवेदन गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहर परिसरातील वाढलेल्या चोऱ्याबाबत पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना निवेदन दिले. त्यामध्ये चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये पोलिस दलाने चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करावी. त्याचबरोबर आठवडी बाजारातही बंदोबस्त नेमावा, अशी मागणी केली आहे.