नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जयसिंगपूर शहरातील बसस्थानकासाठी कॉक्रिटीकरण व सुशोभीकरणकरण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभीयांना अंतर्गत दोन कोटी बावीस लाखांचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी बस स्थानकासाठी याच योजनेअंतर्गत दोन कोटी 65 लाख इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
सांगली कोल्हापूर रोडवरील महत्त्वाच्या अशा जयसिंगपूर शहरासाठी व तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिहवाडी बस स्थानकासाठी हा निधी मंजूर झाला असल्यामुळे ही दोन्ही बस स्थानके उत्तम दर्जाची होणार असल्याचे आम. यड्रावकर यांनी म्हटले आहे.
हा निधी मंजूर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सहकार्य केले यामुळे त्यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले आहे.