हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे बुधवारी छ. संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या फोटोवरून हिंदु-मुस्लिम वाद निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने दोन्ही समाजाची शांतता बैठकीचे आयोजन केले असता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून पोलिस प्रशासनाचा निषेध केला. फेसबुकवर टिपू सुलतान व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोमध्ये तफावत निर्माण करून आलेल्या पोस्टला दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या मिस्त्रीने लाईक व अटॅचमेंट करून अवमान केल्याप्रकरणी स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन दोघांना मारहाण केल्याने त्यातील एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला. यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते निलेश शिरीष शिंदे, श्रीकांत कदम, राकेश घालवाडे या तिघांवर मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तर मुस्लिम समाजात तरूणांवर किरकोळ एनसी दाखल केली आहे.
पोलिसानी तपास करताना योग्य विचार न करता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शिरोली पोलिसांनी दोन्ही समाजातील वाद मिटवण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता शांतता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, सुरेश यादव, नितीन चव्हाण, प्रकाश कौंदाडे, अविनाश कोळी, दीपक यादव, दिलीप कौंदाडे, योगेश खवरे, प्रशांत कागले, संदीप पोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.