पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाडिक बंगल्याजवळ ट्रकच्या धडकेत सांगलीचा युवक जागीच ठार झाला. वैभव वसंतराव पाटील असे अपघातातील मयत युवकाचे नाव आहे. वैभव पाटील याचे मुळगाव शिगाव. त्याचे वडील शिक्षक असल्याने सांगली शहरात स्थाईक झाले असून गावाकडे शेती असल्याने वैभव हा शेतात वाटेकरी लावून शेतीच करत होता. तो शनिवारी कामानिमित शिगावहून कोल्हापूरकडे जात असताना शनिवारी दुपारी १:३० वाजण्या सुमारास महाडिक बंगल्याजवळ आला असता ट्रक व अन्य मालवाहतुक करणाऱ्या गांड्याच्या मधोमध सापडल्याने त्याला आपली मोटरसायकल साईडला घेता आली नाही.
त्यामुळे त्याच्या दुचाकी क्रमांक (एम एच १० डी के ८७४४ ) चे हँडेल अन्य मालवाहतुक गाडीला धडकल्याने वैभवचे मोटारसायकलीवर ताबा सुटल्याने तो ट्रकच्या बाजूस आला असता ट्रक क्रमांक (एम एच ५० – १९३५ ) ने त्याला जोराची धडक दिली यात वैभव जागीच ठार झाला. वैभवच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.