पट्टणकोडोलीतील पंचकल्याण महामहोत्सवाची युद्धपातळीवर तयारी

३४ वर्षांनी होणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील जैन धर्मियांच्या 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पंचकल्याण महामहोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू झालेली आहे. येथील १००८ भगवान आदिनाथ दिगंबर मंदिरापासून गावातील सर्वच भागांमध्ये सुविचारांचे रंगकाम फलक केले जात आहेत. मठ परिसरात असणाऱ्या वळीवडे, पाटील, पिराई यांच्या शेतामध्ये या भव्य अशा पंचकल्याण महामहोत्सवाच्या पूजा मंडपाच्या उभारणीचे काम सुरू असून पूजा मंडप, जेवण विभाग मंडप, पार्किंग व्यवस्था, खाद्यपदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल अशा प्रकारे मंडप व्यवस्था केली जात आहे. ३४ वर्षांनी होणाऱ्या या महामहोत्सवाची पट्टणकोडोलीसह परिसरात उत्सुकता लागली आहे.