हातकणंगले लोकसभा मतदारसंघात रणनीती काय असावी यासाठी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील यांची उपस्थिती होती.
या बैठकीत प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत आल्याचे सांगण्यात आले आणि लवकरच याचा निर्णय देखील होईल असे सांगण्यात आले. या बैठकीत प्रांतिक सदस्य व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नेते मदन कारंडे, नितीन जांभळे, माजी आम. राजीव आवळे पाटील, आर. के. पवार आदी उपस्थित होते.