आष्टा येथील श्री क्षेत्र काशिलिंग बिरोबा देवस्थानास निधी देऊ: आ. पडळकर

श्री क्षेत्र काशिलिंग बिरोबा दिवस्थान आष्टा यांच्या वज्रलेप प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित लघुरुद्र पूजा, महाप्रसाद, महाआरती व पालखी मिरवणूक अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी आ. पडळकर बोलत होते. ते म्हणाले, आष्टा बिरोबा देवस्थान हे पश्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचा समावेश व वर्ग देवस्थानमध्ये करून शासनाकडून मंदिर सुशोभीकरना करिता पाच कोटी रुपये निधी देण्यासाठी प्रयत्न करू.

समाजातील सर्व बांधवांनी गट तट न बघता श्री काशिलिंग बिरोबा देवस्थान विकासासाठी एकत्र येऊन मंदिराचे सुशोभीकरण करावे. या देवस्थानने पूर्वीपासून गोवंश टिकवण्याचे काम फार चांगल्या पद्धतीने केलेले आहे. या गाईंना दररोज एका गाईस ५० रुपये अशा पद्धतीने सुमारे २०० गाईंना रोज दहा हजार रुपये फंड उपलब्ध होईल यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.