आटपाडी शहरात साठे चौक ते साईमंदिर येथील ड्रेनेजचे काम सुरुवात करण्यात येणार आहे. रस्त्यावर असणा-या अतिक्रमणाचा त्रास होत असल्यामुळे साठेनगर ते सिध्दनाथ चित्रमंदिर या भागातील व्यावसायिकांनी दुकान गाळ्याबाहेर बांधण्यात आलेल्या पत्रा शेड व इतर बांधकाम काढण्यात आली. अतिक्रमण काढून घेण्यासाठी व्यापारी वर्गातून सहकार्य मिळाल्याने दोन्ही बाजूकडून रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे.
नागरिकांना चांगला रस्ता लवकरच मिळले अशी आशा आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता प्रश्न निर्माण झाला होता. आ. सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, युवानायक दत्तात्रय पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करुन रस्त्यांचा कामाला गती देण्याचा इतिहासीक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आटपाडी शहरात आधुनिक पध्दतीने रस्ता दर्जेदार होणार आहे.