विशाल दादा पाटील यांच्या आटपाडी दौऱ्यास उस्फूर्त प्रतिसाद!

सध्या विशाल दादा पाटील हे अनेक गावांच्या दौऱ्यावर आलेले आहेत. देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातल्या महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार आणि आय पक्षाचे राज्याचे नेते विशाल दादा पाटील यांचे आटपाडी तालुक्यांमध्ये अनेक गावात मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्त भावनेने स्वागत करण्यात आले.

विशाल दादा पाटील यांचे आटपाडी मध्ये एसटी स्टँड परिसरात आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीने आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. सध्या विशाल दादा पाटील हे अनेक गावांच्या दौऱ्यावर आलेले आहेत. तर विशाल दादा पाटील यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी उस्फूर्त दाद देत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.