आटपाडीत विदेशी दारूसह आठ लाखांचा माल जप्त….

आटपाडी पोलिस ठाणे हद्दीतील आबा नगर चौक येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली  होती. यावेळी साठेनगर चौकाकडून
आलेल्या चारचाकी वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. या वाहनात दारुचे बॉक्स आढळून आले. या वाहनातून विनापरवाना विदेशी दारुची वाहतूक होत होती. पोलिसांनी  मुद्देमालासह वाहन जप्त केले. 

वाहन चालक सलमान एजुल शेख न्त (वय २०, सध्या रा. विरंगुळा बार, आटपाडी. मूळ रा. फुतकीपूर, ता. जि. साहबगंज, राज्य झारखंड) यास सांनी ताब्यात घेतले. यावेळी वाहनातून यदा विदेशी कंपनीच्या असे एकूण नाची १,१३,६००/- रुपये किमतीचा प्रोव्ही हीत माल व चारचाकी वाहन असा एकूण सुरू ८,१३,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सांगली यांनी अवैध दारू वाहतूक, जुगार, गडे, गुटखा वाहतूक, गांजा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे आबा नगर चौक येथील नाकाबंदी वेळी हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी वाहनाची तपासणी करत कारवाई केली.