इस्लामपूर वाळवा तालुका स्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण संपन्न!

इस्लामपूर वाळवा तालुका स्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणांतर्गत वाळवा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात १५० प्रशिक्षनार्थी यांनी सहभाग घेतला.

या प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणविस्तार अधिकारी अंबी साहेब, गायकवाड मॅडम, संजय पाटील पंचायत समितीचे विषय तज्ञ महेश पाटील, राम यादव सर, पोखर्णीकर सर, प्रवीण पाटील यांनी नियोजन केले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी म्हणाले, विद्यार्थी आतानवीन संकल्पनेनुसार शिकण्यासाठी शिकणार यातून त्यांचा सर्वांगीण विकास होणार, बदलत्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन याबाबद मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण अंतर्गत मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, शिकण्यासाठी विध्यार्थी यांना शिकण्यास आव्हान देणे, लर्निंग इंटरवेशन, जिज्ञासू वृतीचा संवाद, अध्ययन गती वाढवणे, आव्हाने स्वीकारणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विविध विषययावर मार्गदर्शन केले.
नवीन पद्धतीमध्ये शिक्षकांनी अध्यापन न करता मुलांना शिकण्यास प्रवृत्त करायचे आहे, विद्यार्थ्यांची अध्ययन गती तिप्पट करायचे आहे. या मुलांची ज्ञानाची कक्षा मोठी करायची आहे.

या विषयाच्या संदर्भाने विविध कृतींचे आयोजन करण्यात आले. विष्णू पाटील, अमोल जाधव, रमेश पाटील, दीपक दळवी, विकास पाटील, शिवाजी साळुंखे, पल्लवी पाटील, गौरी कुलकर्णी मॅडम, सुनीता कुलकर्णी यांनी सुलभकाची भूमिका पार पाडली.