शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कृषी स्मार्ट प्रकल्पामुळे उत्पादन वाढीबरोबरच बाजारपेठेत संधीही वाढणार…!

शेतकऱ्यांना स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने ‘बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत Agriculture Smart Project राबवण्यात येत असून, जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्प नोंदणीकृत आहेत. सध्या मोसंबी ग्रेडिंग, सोयाबीन व इतर धान्य स्वच्छ करून विक्री करण्याचे १७ प्रकल्प सुरू झाले आहेत.

Agriculture Smart Project म्हणजे काय?

हा प्रकल्प सात वर्षांसाठी असून, शेतकरी उत्पादक भागीदारी अंतर्गत बियाणे-खत उत्पादक, शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार, घाऊक व किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. जालना जिल्हा हा मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने येथे मोसंबी ग्रेडिंगचे सर्वाधिक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यानंतर सोयाबीन, तूर, हरभरा, कांदाचाळ, आधुनिक औजारे गोदाम, भाजीपाला प्रक्रिया आदी प्रकल्पांचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आर्थिक सहाय्य:

  • स्मार्ट प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांचा ४०% वाटा आवश्यक असून, उर्वरित ६०% निधी वर्ल्ड बँकेकडून दिला जातो. यासाठी किमान २५० शेतकरी भागधारक आणि ५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल आवश्यक आहे.
  • या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतकरी स्मार्ट प्रकल्प उभारणीकडे वळले असून, ‘फार्म प्रोड्युसर कंपनी’ (FPC) च्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

स्मार्ट प्रकल्पांचे उद्दिष्ट:

  • महिलांना शेतकरी दर्जा प्राप्त करून देणे
  • कृषी व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढविणे
  • नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे
  • शेतीमाल विपणन व व्यवस्थापन सुधारणा

या पायाभूत सुविधांसाठी मिळते अनुदान:

  • गोदाम
  • शेतीमाल स्वच्छता, छाननी व प्रतवारी युनिट
  • प्रक्रिया युनिट
  • कांदाचाळ आणि संकलन केंद्र
  • जिनिंग व प्रेसिंग युनिट
  • ग्रेडिंग व पॅकिंग युनिट
  • कृषी चाचणी प्रयोगशाळा

Agriculture Smart Project मुळे होणारे फायदे:

  1. शेतकऱ्यांना बाजारात अधिक चांगली किंमत मिळणार
  2. शेतीमाल प्रक्रियेसह विक्रीला चालना मिळणार
  3. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढणार
  4. कृषी उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार
  5. स्थलिक व जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळणार