अलीकडच्या या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये खूपच फरक जाणवत आहे. कधी थंडी, कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी खूपच चिंतेत आहे. सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होत आहे.
काही भागात अवकाळी पाऊस झाला. पुन्हा पाऊस येईल की काय, या भीतीने द्राक्ष बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायतदारानी आपल्या द्राक्ष बागांची खूप काळजी घेऊन खूप चांगले द्राक्षांचे पीक आणलेले आहे. हीच द्राक्षे आता काढणीला आलेली आहेत.
आता पुन्हा अवकाळी पाऊस येणार की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना या ढगाळ वातावरणामुळे पडलेला आहे. महिन्यापूर्वी अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला होता. त्यांचे पंचनामे केले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.