वाळव्यातील २५ एकर ऊस आगीत जळून खाक, लाखोंचे नुकसान

वाळवा येथील २५ एकरातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी वाळवा – आष्टा रस्त्यावरील म्हसोबा मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस महावीर होरे, अरुण होरे, विजय होरे, रावसो होरे, महावीर व सुनील भीमराव पाटील, जितेंद्र देशपांडे,अरविंद देशपांडे, सुरेश देशपांडे, महेश देशपांडे, अभिजित व अमित देशपांडे, वसुधा देशपांडे, उज्ज्वला देशपांडे, अमोल जाधव, संजय जाधव, विलास जाधव यांच्या उसाला आग लागली. २५ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शेतकऱ्यांनी हुतात्मा कारखान्याला कळवले. अग्निशमन बंब तात्काळ आला. प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही.