इचलकरंजीतून महाविकास आघाडी पाठिंबा देईल…

मागच्या वेळ झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला असून, सतत जनसंपर्क ठेवत नाराजी दूर करुन मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझा निवडणूक लढवण्याचा विचार पूर्ण असल्याने विरोधातील उमेदवाराशी देणेघेणे नाही.

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित, असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (दि.२९) इचलकरंजीत व्यक्त केला. भाजपचा पराभव करायचा असल्याने महाविकास आघाडी पाठींबा देईल असा पुनरुच्चारही त्यांनी केला.इचलकरंजीत आज माजी खा. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. तसेच त्यांनी अन्य संघटनांच्या पदाधिकार्‍यांशीही संवाद साधला.