इचलकरंजी महापालिकेत २५ वर्षे सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला त्याचे हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल आवास योजना सुरु केली आहे. पाठपुरावा करूनही या योजनेची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या योजनेचा सुधारित आराखडा बनवावा या मागणीसाठी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून स्टेशन मार्गावरील आंबेडकर पुतळ्या जवळ बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
२०२१ पासून तत्कालीन नगरपालिका व आत्ताच्या महानगरपालिकेकडे मी पाठपुरावा करत आहे. परंतु म हापालिकेकडून सफाई कर्मचान्यांसाठी घरकुल बांधण्या करिता अद्याप ही जागा उपलब्ध करून दिली नाही. महापालिका अधिकान्यांसोबत झालेल्या बैठकीम ध्ये शहरातील चार जागा यासाठी निवडल्या गेल्या होत्या. जुन्या इमारती पाडून त्याठिकाणी ५०० चौरस फुटाची स्वतंत्र घरे बांधून द्यावी. यासाठी वेळोवेळी मागणी करूनही महापालिका प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सध्या एकूण ७४२ सफाई कर्मचारी कार्यरत असून यापैकी सुमारे २०० लोकांना हक्काची घरे मिळणार आहेत.