सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा लाइन चेंबर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या

सांगोला तालुक्यातील डिकसळ भागात आश्रमशाळा ते भुसनर वस्तीपर्यंत यापूर्वी पांढरी पाईपलाईन करण्यात आली आहे. सदर पाईपलाईनला ३ कि.मी. पर्यंत कोठेही चेंबरची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ घेता येत नाही. याबाबतीत चौकशी करून सदर पाईपलाईनला चेंबर उपलब्ध करून मिळावेत अथवा नवीन काळी पाईपलाईन करून या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

शेतकऱ्यांना म्हैसाळचे पाणी मिळाले आहे. परंतु, काही शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. असा विनंती अर्ज कार्यकारी अभियंता म्हैसाळ उपसा सिंचन योजना पंपगृह वि. क्र. २ उपविभाग सांगली यांच्याकडे तुकाराम भुसनर यांनी केला आहे. त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहिलेल्या वंचित शेतकऱ्यांची कामे करु, असे आश्वासन दिले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक करताडे, बाळू भुसनर, आप्पा भुसनर, धुळा गोरड, सुरेश उजनीकर, आबा उजनीकर उपस्थित होते.