सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये ०३ मार्च रोजी रात्री ०९:४० ते ०९:५० वा दरम्यान सांगोला शहरातुन सांगोला मिरज रस्त्यावरून माऊली वॉशींग सेंटरच्या जवळुन राउत मळयाकडे जाणाऱ्या ओढ्याचे अलीकडील बाजुला असणाऱ्या रस्त्यावर आबासो अशोक राऊत हे सांगोला शहरातुन पिग्मीची रक्कम जमा करून त्यांचे राहते घरी जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवुन त्यांचे डोळयात मिरची पुड टाकुन, दुखापत करून, त्यांचेकडील २५ हजार रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरून नेल्याने त्यांचे फिर्यादी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा हा जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याकडुन दोन तपास पथक करून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोपणीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेखर शशिकांत कारंडे यास फलटण शहर पोलीस येथून ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीत याने गुन्ह्याची कबुली दिल्याने व त्यास अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने अटक आरोपीस 0५ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.