सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलन

बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसीलदार संतोष कणसे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सांगोला तालुक्यात चालू असलेले बेकायदेशीर खडी क्रेशर हे हरित लवादाची परवानगी न घेता चालू केलेले आहेत तसेच शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अटी व शर्तीचा भंग केला असून सदर खडी क्रेशर मालकांनी दगड खाणीतून अतिरिक्त उत्खनन केल्या कामी सर्व खडी क्रेशर याची ईटीएस मोजणी करून शासनाची रॉयल्टी भरून घ्यावे व बेकायदेशीर सर्व खडी क्रेशर चालू केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सौरभ शिंदे, कालिदास कसबे, प्रशांत यादव, राहुल कोडक, निखिल पवार, हे उपस्थित होते.