कबनूर ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रॉनसाहेब ऊरुसानिमित्त आयोजित कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. महान भारत केसरी पै. विशाल भोंदू याने महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख याच्यावर ‘फ्रंट सालतो’ डावा वर विजय मिळवला. पै. भोंदू याने रोख बक्षिसासह माजी सरपंच कै. इस्गोंडा म्हा. पाटील यांचे स्मरणार्थ माजी सरपंच सुधीर पाटील यांनी ठेवलेली चांदीची गदा पटकावली. ही कुस्ती पै. अमृत भोसले व मान्यवरांचे हस्ते लावण्यात आली होती.
महिला कुस्तीत राष्ट्रीय पदक विजेती पै. गौरी पाटील हिने हरियाणाची पै. हिराणी हिच्यावर विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच माजी सरपंच कै.वस्ताद देवगोंडा पाटील यांचे स्मरणार्थ माजी सरपंच सुधीर पाटील यानी ठेवलेली चांदीची गदा पटकावली. ही कुस्ती पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली होती.
प्रथम कुस्ती मैदानाचे उद्धघाटन पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, पै.अमृत भोसले, संचालक प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, सदस्य मधुकर मणेरे, सुधीर पाटील, समीर जमादार, प्रविण जाधव, बी.डी. पाटील, बबन केटकाळे, सुनिल इंगवले आदी मान्यवरांचे हस्ते झाले. यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे व इतर मान्यवरांचे हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. तसेच कबनूर पत्रकारांचे हस्ते पाच कुस्त्या लावण्यात आल्या.
पंच म्हणून पै. आण्णा निंबाळकर, अमोल मदने, तुकाराम मदने, संजय सुतार, सरदार मुल्लाणी, पापालाल मुल्लाणी, सदाशीव चव्हाण, नंदू पाटील, बाळु माने यानी काम पाहिले. निवेदक म्हणून जोतीराम वाझे, सांगली व सुधाकर महाडीक यानी काम पाहिले. यावेळी शंकर सुतार, किशोर पाटील, अनिल हजारे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, आण्णासो पाटील ढंग, बी. एस. पाटील, डी एस. पाटील आदी उपस्थित होते. सदस्य सुधीर पाटील यानी आभार मानले.