लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत एक टक्का मतदान वाढले असून, ते कोणाच्या पथ्यावर पडणार हा मात्र उत्सुकतेचा विषय ठरला आहे. वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हातकणंगलेत शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे.
