सरकारतर्फे करण्यात आलेली भाडेवाढ याच्या विरोधात सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहेत. अनेक आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. हातकणंगलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यास अनुसरून हातकणंगले बस स्थानकसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला. तसेच गोरगरीब व सामान्य जनतेचा प्रवासाचा आधार असलेल्या एस.टी. बसेसची अन्यायकारक केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी, तसेच प्रवाशांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून हातकणंगले एस. टी. आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण यांनी देखील आपल्या मनोगतामधून शासनाने केलेली
भाववाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला.
