हातकणंगले हद्दीतील इंडो काऊंन्ट कामगारांच्या आंदोलनावर काढला तोडगा

हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील इंडो काऊंन्ट मिल मधील कामगारांनी त्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन सुरु होते. इंडो काऊंन्ट मिल मधील कामगार लोकशाही मार्गाने गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र मिल प्रशासन कोणतीच दाखल घेत नाहीये आणि कुठलेच सकारात्मक चर्चा अथवा प्रयत्न होत नसल्याने कामगारांनी काम बंद ठेवले आहे. स्थानिक कामगारांनी मिलच्या प्रवेश द्वारासमोरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली होती.

अखेर शनिवारी मध्यरात्री इंडोकाऊंट कंपनीमधील भूमीपुत्रांच्या आंदोलनावर तोडगा निघाला. तहसीलदार सुशिल बेल्हेकर, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पहावे लागेल कंपनीने दिलेले आश्वासन व्यवस्थापनाकडून कितपत पाळले जाते. या आंदोलननात शासकीय अधिकारी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रविण जनगोंडा, ग्रा.प. सदस्य जावेद मुजावर, शिरिष थोरात सुरेश आळतेकर, कंपनी प्रशासन कामगार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.