इचलकरंजी येथे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाचे; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने सुरु आहेत तसेच मंजूर कामांची माहिती फलक कोठेही लावले नाहीत याबाबतची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे या निकृष्ट कामकाजाबाबत संबंधीत मक्तेदारावर कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागून राहिले आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोत्थान ५१ कोटी अंतर्गत या योजनेतून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत रस्ते व इतर कामे चालू आहेत. त्यापैकी एक सांगली रोड ते वडगाव बाजार समिती परिसर रस्ता अत्यंत हळू गतीने व निकृष्ट पध्दतीचे काम चालू आहे.

हा मार्ग हा नेहमीच शाळा, कॉलेज व बाजाराचा मुख्य मार्ग असलेने नेहमीच या रस्त्यावर गर्दी आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अन्यथा अपघात होवून जिवित हानी होणेची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर व संबंधित मक्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंद करु नये? असा प्रश्न उपस्थित होवू शकतो. तिथे कामाचे माहिती फलक असणे क्रमप्राप्त आहे. तरी शहरातील सर्व कामाच्या ठिकाणी तसे कामाचे माहिती फलक आढळून येत नाहीत. तरी सामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावणे आवश्यक आहे. 

वरील सर्व रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट कामगिरी बद्दल सदर कामाची आपले स्तरावरुन चौकशी करुन संबंधित मक्तेदारावर योग्य ती कारवाई करावी, आणि आपल्या सार्वजनिक बांधकाम हातकणंगले विभाग अधिकाऱ्यांच्याकडे याबद्दल तक्रार केली असता शासनाकडून पैसे उपलब्ध करुन आणा मग रस्ते करतो असे उध्दट उत्तरे अधिकारी वर्गाकडून येत आहेत. याबाबतही संबंधित अधिकाऱ्यास योग्य ती समज द्यावी अन्यथा त्या अधिकाऱ्या विरुध्द वडगाव बाजार समिती परिसरातील नागरिकांसह तीव्र आंदोलन करणेत येईल. असा इशारा ही तक्रारदार शहर भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी दिला आहे.