धैर्यशील माने यांच्या प्रचार मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपाने स्थापन केलेल्या आघाडीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजय करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावे. आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामास साथ करा असे आवाहन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे केले.मेळाव्यात प्रारंभी जिलानी टाकवडे यांनी स्वागत केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कडोलकर यांनी प्रास्ताविक केले.

सुरेश हाळवणकर पुढे म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास या तत्त्वाने धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला.याप्रसंगी सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके व इतर मान्यवर. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, आणि रेशन मधून धान्य देताना जात धर्म पक्ष पंथ बघितला नाही. आता ही लोकसभेची निवडणूक असून भारत शक्तिशाली देश कसा करणार ?हे ठरवणारी आहे. पण काँग्रेस सह विरोधक गटारी रस्ते आणि पाणी आपले गाव पाठीवरचे विषय मांडून दिशाभूल करत आहेत. मोदींच्या स्पष्ट परराष्ट्र नीतीमुळे ते जगात एक नंबरचे नेते बनले आहेत.

भारतातील २५ कोटी लोकांची गरिबी हटली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. संगायो लाभार्थीच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असून वयश्री योजनेसाठी नाव नोंदणीचे काम संघटनेतर्फे सुरू करा. आणि योग्य त्या माणसापर्यंत सरकारी योजनांचा लाभ द्या असेही त्यांनी आवाहन केले .तर इचलकरंजी ते ज्येष्ठ डॉक्टर एस. पी. मर्दा यावेळी म्हणाले, नरेंद्र मोदींचे नेतृत्व फार महत्त्वाचे असून जगाच्या पाठीवर देशाला मोठे स्थान मिळवून दिले आहे. सर्वसामान्यांच्या हे लक्षात येत नाही. ते जगातील एक नंबरचे नेते आहेत. असे सांगीतले