सोलापुरात आजपासून यादी शुद्धीकरण मोहीम! कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांच्या सुट्ट्या व रजा रद्द

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आजपासून मंगळवेढा तालुक्यात सलग तीन दिवस मतदार यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.या मोहिमेंतर्गत मतदार यादीची तपासणी करणे, दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे वगळणे, 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नव्याने नोंदणी करणे, मतदार यादी मधील नावांमध्ये असणाऱ्या दुरुस्ती करणे अशी विविध कामे केली जाणार आहेत.

या मोहिमेमध्ये एकूण 16 तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामस्तरावर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असे पथक असणार आहे.

या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात मोहीम राबवून मतदार यादीतील दुरुस्ती आणि नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे. तरी या मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांना तीन दिवस सलग असणाऱ्या सुट्ट्या व रजा रद्द करण्याचालेखीआदेशपारितया विशेष मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कर्मचाऱ्यांना तीन दिवस सलग असणाऱ्या सुट्ट्या व रजा रद्द करण्याचा लेखी आदेश पारित केलेला आहे.